Tue, May 26, 2020 09:10होमपेज › Goa › नू शि जहाजातील नाफ्ता काढण्यास कामाचा उद्यापर्यंत आदेश

नू शि जहाजातील नाफ्ता काढण्यास कामाचा उद्यापर्यंत आदेश

Last Updated: Nov 16 2019 11:17PM
पणजी : प्रतिनिधी 

दोनापावला येथे समुद्रात भरकटून आलेल्या नू शि  नलिनी या  जहाजातून नाफ्ता काढण्यासाठी हॉलंड येथे  मास्टर मरीन  कंपनी निश्चित  करण्यात आली आहे. या कंपनीला सोमवारपर्यंत जहाजोद्योग महासंचालकाकडून ं(डीजी शिपिंग) कामाचा आदेश जारी करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्र्यांच्या गटाने  मास्टर मरीन  कंपनीला नू शु नलिनीमधून नाफ्ता हटविण्याचे काम देण्यावर शिक्कामोर्तब  केले आहे.  त्यानुसार ही  कंपनी नाफ्ता  काढण्याचे काम करेल.  कंपनीकडून नाफ्ता काढण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाईल,असेही त्यांनी सांगितले.नू शि नलिनी या हे नाफ्तावाहू  जहाज  मुरगाव येथील एमपीटीतून भरकटून दोनापावला येथे समुद्रात अडकून पडले आहे. या जहाजात  2 हजार टन नाफ्ता ,50 टन इंधन तसेच 19 टन डिझेल आहे. जवळपास वीसपेक्षा अधिक दिवसांपासून हे जहाज तेथेच अडकले असल्याने  त्यातील नाफ्ता काढण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

काँग्रेस तसेच दोनापावला  किनार्‍यावरील पारंपरिक मच्छीमार  हे  जहाज तेथून हटवण्याची मागणी करीत आहे. नाफ्ता  हे घातक रसायन असल्याने नाफ्ताची गळती झाल्यास  त्याचा समुद्रातील  मासळीवर परिणाम होईल  तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या लोकांसाठी देखील ते धोकादायक ठरणार असल्याची भीती त्या भागातील पारंपरिक मच्छीमारांकडून  व्यक्त केली जात आहे