Mon, May 25, 2020 03:20होमपेज › Goa › वाल्मिकी नाईक यांना ‘आप’ची उमेदवारी : एल्विस गोम्स

वाल्मिकी नाईक यांना ‘आप’ची उमेदवारी : एल्विस गोम्स

Published On: Apr 13 2019 1:54AM | Last Updated: Apr 13 2019 1:50AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी पोटनिवडणुकीसाठी  आम आदमी पक्षातर्फे (आप) वाल्मिकी  नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे निमंत्रक तथा लोकसभेचे दक्षिण गोवा उमेदवार  एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

वाल्मिकी नाईक हे गोव्यातील ‘आप’चे सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ‘आप’च्या पणजी विभागाने घेतला असल्याचे गोम्स यांनी  सांगितले.
गोम्स म्हणाले, पणजी पोटनिवडणुकीत नाईक यांना काँग्रेस तसेच अन्य पक्षांनी पाठिंबा द्यावा. युवा मतदारांचा कौल तरुण उमेदवारांच्या दिशेने आहे. त्यामुळे ‘आप’चा उमेदवार हा युवकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवल्यास पणजी पोटनिवडणुकीत भाजपचा पराजय निश्‍चित होईल. ‘आप’ ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप केला जातो. मात्र हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. सदर आरोप खरा असल्याचे विरोधकांनी सिद्ध करून दाखवावे.  आरोप सिद्ध केल्यास सर्व  उमेदवार मागे घेतले जातील, असे आव्हानही गोम्स यांनी दिले.

यावेळी ‘आप’चे प्रदेश सरचिटणीस तथा लोकसभेचे उत्तर गोवा उमेदवार प्रदीप पाडगावकर, म्हापसा पोटनिवडणुकीचे उमेदवार  शेखर नाईक, नेते  सुनील सिंगणापूरकर व  बिएट्रीज  पिंटो उपस्थित होते.