Wed, May 27, 2020 16:58होमपेज › Goa › 'वेलिंगकरांची विनाकारण बदनामी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार' 

'वेलिंगकरांची विनाकारण बदनामी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार' 

Published On: May 17 2019 2:22PM | Last Updated: May 18 2019 1:43AM
पणजी : प्रतिनिधी

गोवा सुरक्षा मंचचे पणजी पोटनिवडणुकीतील उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करणारी पत्रके वाटली जात आहे. सदर प्रकार निषेर्धात असल्याचे मंचच्या महिला विभागाच्या अध्यक्ष अ‍ॅड. रोशन सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रकरणी मंचतर्फे  पोलिसांत रीतसर तक्रार केली जाणार आहे. त्याचबरोबर अब्रुनुकसानीचा दावाही ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. सामंत म्हणाल्या, की पणजी पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस राहिले असून  मंचचे उमेदवार वेलिंगकर यांची बदनामी करणारे पत्रके वाटण्यात आली आहेत. या पत्रकाव्दारे त्यांच्या चारित्र्यावर चिखलफेक  करण्यात आली.  सदर प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची टीका त्यांनी  केली.

गलिच्छ राजकारणाचे हे उदाहरण आहे. निवडणुकीला काही दिवस बाकी असून केवळ मतदारांच्या मनात संशय तयार  करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.