Wed, May 27, 2020 05:34होमपेज › Goa › केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी आज गोव्यात

केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी आज गोव्यात

Published On: Sep 09 2019 1:30AM | Last Updated: Sep 09 2019 1:30AM
पणजी : प्रतिनिधी

केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी सोमवारी (दि. 9) राज्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. जोशी केंद्रीय खाणमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच गोव्याच्या दौर्‍यावर येत असल्याने राज्यातील बंद खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

केंद्र सरकारच्या शंभर दिवसांत राबवलेल्या उपक्रम आणि धाडसी निर्णायक कृतींवर जोशी सोमवारी सकाळी येथील एका हॉटेलात पत्रकार परिषद घेणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

खाण अवलंबितांचे प्रश्‍न सोडवा : गावकर

देशाचा सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर (जीडीपी) 5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे, अशी टीका मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली. ते म्हणाले, आर्थिक मंदीमुळे देशभरातील वाहन उद्योगातील सुमारे 10 लाख, ब्रिटानिया कंपनीतील 3500 लोकांच्या नोकर्‍या जाणार आहेत. राज्यातील शेतकरी, खाण अवलंबितांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकार फक्‍त महाकाय प्रकल्प आणि साधनसुविधा उभारण्याच्या बाता करत आहे. केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यातील खाण अवलंबितांच्या मागण्यांवर लक्ष घालून तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणीही पुती गावकर यांनी केली आहे.