Tue, May 26, 2020 09:28होमपेज › Goa › श्रीपाद नाईक यांनी प्रचाराला केली सुरुवात

श्रीपाद नाईक यांनी प्रचाराला केली सुरुवात

Published On: Mar 14 2019 4:55PM | Last Updated: Mar 14 2019 4:55PM
 पणजी : प्रतिनिधी
 

केंद्रीय आयुष्यमंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी(दि. १४) रोजी फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ येथील म्हाळसा नारायणी देवस्थानातून प्रचाराला सुरुवात केली. खासदार नाईक आगामी वीस दिवस दर दिवशी एका मतदारसंघात दौरा करणार आहेत .यावेळी महत्त्वाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तसेच अन्य मान्यवर व्यक्तींनाही ते भेटणार आहेत.

खासदार नाईक यांनी सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारतर्फे आपण गोव्यात अनेक विकास कामे राबवली आहेत. मागील पाच वर्षे देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला विकास लोकांनी पाहिला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक सरकारला संधी देण्यास लोक उत्सूक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लवकरच गोव्यात दौरा होणार असून ते एका सभेलाही संबोधन करणार आहेत.

खाणबंदी समस्येवर बोलताना नाईक म्हणाले की,  खाणी बंद झाल्याकारणाने राज्यातील अनेक लोकांना त्रास आणि  हालअपेष्टांना सहन करावा लागल्या आहेत. खाणबंदीचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामूळे सोडवता आला नाही. मात्र परत आम्ही सत्तेवर येवू त्यावेळी खाणबंदीचा विषय सोडविण्यास प्राधान्य देऊ.

भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये वाद सुरू असल्याच्या अफवांना त्यांनी नकार दिला. तसेच  भाजपबरोबर सर्व युती पक्ष एकत्र असून भाजप उमेदवारांना जिंकण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. असे ही सांगितले.