Tue, May 26, 2020 08:27होमपेज › Goa › शापोरात दोन विदेशी दलालांना वेश्या व्यवसायप्रकरणी अटक 

शापोरात दोन विदेशी दलालांना वेश्या व्यवसायप्रकरणी अटक 

Last Updated: Dec 14 2019 1:29AM
बार्देश : प्रतिनिधी 
देऊळवाडा-शापोरा येथे हणजूण पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत  दोन विदेशी तरुणींची वेश्या व्यवसायातून  सुटका केली. याप्रकरणी एबिकीवा आलियाना (वय 38) तसेच रोनव बिकनोव्ह (20) या किर्गीस्तान तसेच तुर्कमेनिस्तानचे  नागरिक  असलेल्या दलालांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडील एक कारही पोलिसांनी जप्त केली आहे.सुटका केलेल्या तरुणींची रवानगी अपनाघरमध्ये करण्यात आली आहे. संशयितांची रवानगी स्थानिक पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. 

हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,   संशयित एबिकीवा आलियाना (मूळ रा. किर्गीस्तान, सध्या रा. मोरजी) तसेच रोनव बिकनोव्ह (मूळ रा. तुर्कमेनिस्तान, सध्या रा. शिवोली),  हे दोघेही तरुण शुक्रवारी मध्यरात्री देऊळवाडा-शापोरा येथील ए. जे. सुपर मार्केटच्या परिसरात  ग्राहकांना मुली  पुरवण्यासाठी येणार असल्याची माहिती खबर्‍यांंकडून स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज गावस यांनी आपले सहकारी उपनिरीक्षक विदेश पिळगांवकर, कॉन्स्टेबल शामसुंदर पार्सेकर, श्रीकृष्ण रेडकर, राजेश गोकर्णकर, महेंद्र मांद्रेकर, किशन बुगडे, तसेच महिला कॉन्स्टेबल श्‍वेता परब आणि अनुजा नाईक यांच्यासमवेत चार रस्ता चौकात  सापळा रचला.  

दरम्यान, मध्यरात्री, दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट  कारमधून (क्र : जीए-03 एच-3425)  संशयित  दोन विदेशी तरुणींसमवेत निर्धारित  स्थळी पोहोचले असता आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना कार थांबविण्यास भाग पाडले. कारची कसून झडती घेतली असता दोन विदेशी तरुणींना वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे आढळले. त्या पीडित मुलींची सुटका करून पोलिसांनी संशयित एबिकीवा अलियाना तसेच रोनव बिकनोव्ह यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी  स्विफ्ट कारही पोलिसांनी जप्त  केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरज गावस यांनी दिली. 

दरम्यान, हणजूण पोलिसांनी संशयिताविरोधात वेश्या व्यवसायात मुलींना गुंतवल्याचा ठपका ठेवून रितसर गुन्हा दाखल केला असून सध्या त्यांची रवानगी स्थानिक पोलिस कोठडीत केली. यासंदर्भात, पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.