Mon, May 25, 2020 12:21होमपेज › Goa › पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू

Last Updated: Jan 25 2020 12:03AM
धारबांदोडा : पुढारी वृत्तसेवा 

कुळे येथे दूधसागर धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या भूपेंद्र शर्मा (वय 48, रा. इंदूर) या मध्यप्रदेशच्या पर्यटकाचा शुक्रवारी दुपारी आकस्मिक मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. लग्नाच्या वाढदिनीच काळाचा घाला पडल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र शर्मा आपल्या कुटुंबासह 21 जानेवारी रोजी गोव्यात पर्यटनासाठी आले होते. शुक्रवारी ते कुळे येथील दूधसागर धबधब्यास भेट देण्यासाठी आले होते. दूधसागर धबधबा पाहिल्यानंतर शर्मा माघारी फिरण्याच्या तयारीत असताना त्यांना अचानक भोवळ आली व ते बेशुध्द होऊन खाली     कोसळले. त्यानंतर त्यांना पिळये येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.

मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. शर्मा हे पत्नी व मुलांसह दूधसागर धबधब्यावर आले होते. शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांचा मृतदेह गोमेकॉच्या शवागरात ठेवण्यात आला असून शनिवारी (दि.25) शवचिकित्सा करण्यात येणार असल्याचे कुळे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी सांगितले. उपनिरीक्षक अजय धुरी यांनी पंचनामा केला असून ते पुढील तपास करीत 
आहेत.