Wed, May 27, 2020 11:55होमपेज › Goa › मगो भाजपमध्ये विलीन करण्याचा मुद्दाच नाही

मगो भाजपमध्ये विलीन करण्याचा मुद्दाच नाही

Published On: Apr 03 2019 1:44AM | Last Updated: Apr 03 2019 12:17AM
पणजी : प्रतिनिधी 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात, सुदिन ढवळीकरांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना मगो पक्ष भाजप मध्ये विलिन करू असे सांगितले होते, असे वक्तव्य केले. मात्र आपण असे काहीच कुणालाच सांगितले नाही. आपण स्वर्गात विलिन होईन, मात्र  मगो पक्ष विलिन करणार नाही, असे प्रतिपादन आमदार तथा मगो चे नेते सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत केले. 

ढवळीकर म्हणाले, मगो पक्ष विलिनीकरणाचा प्रश्‍नच येत नाही.  मगो पक्ष हा आपण  स्थापन केला नसून  स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी बहुजनांसाठी मगोची निर्मिती केली. त्यामुळे मगो पक्षासंदर्भात निर्णय घेण्याचा आपल्याला कोणताच अधिकार नाही. पक्षाचे निर्णय केवळ केंद्रीय समिती घेऊ शकते. 

मगो पक्षा ने भाजप सरकारला पाठिंबा देणारे पत्र सरकार स्थापने दिवशीच  दिले होते. त्यामुळे पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्‍नच नव्हता, असे त्यांनी सांगितले.