Thu, May 28, 2020 19:59होमपेज › Goa › राहुल गांधींच्या भेटीत ‘राफेल’चा उल्लेखही नाही

राहुल गांधींच्या भेटीत ‘राफेल’चा उल्लेखही नाही

Published On: Jan 31 2019 1:30AM | Last Updated: Jan 30 2019 11:21PM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भेट घेतली त्यावेळी चर्चेत ‘राफेल’  विमानाबद्दलचा उल्लेखही आलेला नव्हता. राहुल गांधी यांनी आपल्यासोबतच्या भेटीत घडलेले सत्य तेच सांगावे आणि आजारी माणसाच्या भेटीचा राजकीय  लाभासाठी  वापर करू नये, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधी यांना पाठवले आहे. 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौर्‍यावर असताना पूर्वनियोजन नसतना अचानक विधानसभेमध्ये जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी पर्रीकर यांच्यासोबत झालेल्या 5 मिनिटांच्या बैठकीत राफेल करारावर चर्चा झाल्याचे गांधी यांनी सांगितले होते. मात्र, पर्रीकरांनी राहुल गांधी खोटे बोलत असल्याचे सांगत सदर वृत्त बुधवारी फेटाळले आहे. 

राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्ली येथील युवक काँग्रेसच्या रॅलीमध्ये राफेल करारावेळी पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्र्याला विचारलेदेखील  नव्हते, असे पर्रीकर यांनी स्वत: सांगितल्याचा आरोप केला होता. यावर पर्रीकर यांनी   पाच मिनिटांच्या बैठकीत राफेल करारावर काहीच बोलणे झाले नसल्याचा खुलासा करून राहुल गांधी खोटे बोलत असल्याचा आरोप  केला. 

पर्रीकर यांनी या संदर्भात राहुल गांधी यांना पत्रही लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधी हे राजकीय लाभ मिळविण्यासाठीच आपल्याला भेटायला आले होते,असा आरोप केला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी यांनी भेटीसाठी वेळ मागितली. राजकीय मतभेद विसरून आपण भेटायला आलात, याबद्दल आपल्याला समाधान वाटले. मात्र, राफेलबाबत आपल्यात चर्चा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून समजले आणि आपल्याला आश्‍चर्याचा धक्काच बसला. प्रकृतीची चौकशी करण्याच्या नावाखाली आपली भेट घेऊन त्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करण्याचा जो प्रकार आपण केला आहे, त्याची आपण कधी  कल्पनाच केली नव्हती, असेही पर्रीकर यांनी राहुल यांना पत्राद्वारे सुनावले आहे.
सध्या  आपला  आजाराशी संघर्ष सुरू असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. आपली भेट सकारात्मकता देईल, असे वाटले होतं. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. अत्यंत खेदाने आपणास सांगावे लागत आहे की, आतातरी सत्य स्वीकारा. यापुढे आजारी माणसाची भेट घेऊन त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन पर्रिकर यांनी पत्रात केले आहे.

पाच मिनिटांच्या बैठकीत आपण दोघेही राफेल मुद्द्यावर बोललो नाही, अथवा त्यासंबंधी चर्चाही केली नाही. ‘राफेल कराराच्या प्रक्रियेचा आपण भाग नव्हतो, त्यामुळे आपल्याला त्याबाबत काही माहिती नाही, असं मी तुम्हाला सांगितलं’, असे तुम्ही माध्यमांना सांगितल्याचे वाचून आपल्याला वेदना झाल्या आहेत, अशा शब्दांत पर्रीकर यांनी पत्रात राहुल गांधी यांना सुनावले आहे.

सध्या माझा जीवनाशी संघर्ष सुरू असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. आपली भेट सकारात्मकता देईल, असं वाटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अत्यंत खेदाने आपणास सांगावं लागत आहे की, आतातरी सत्य स्वीकारा. यापुढे आजारी माणसाची भेट घेऊन त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन पर्रिकर यांनी पत्रात केलं आहे.पाच मिनिटांच्या बैठकीत आपण दोघेहीराफेल मुद्द्यावर बोललो नाहीत अथवा त्यासंबंधी चर्चाही केली नाही. ‘राफेल कराराच्या प्रक्रियेचा मी भाग नव्हतो, त्यामुळे मला त्याबाबत काही माहिती नाही, असं मी तुम्हाला सांगितलं’, असे तुम्ही माध्यमांना सांगितल्याचे वाचून आपल्याला वेदना झाल्या आहेत, असेही पर्रीकर यांनी पत्रात  नमूद केले आहे.

सदिच्छा भेटीचे राजकारण योग्य नाही : माविन गुदिन्हो

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सदिच्छा भेट घेतली होती. ही सदिच्छा कायम रहायला हवी होती. आपण सर्वजण विविध राजकीय पक्षात सदस्य असलो तरी एकमेकांच्या संबंधात कोणतेही राजकारण आणू नये. ज्येष्ठ नेते जर भेटीचे देखील राजकारण करू लागले तर ते संयुक्तीक नाही, असे पंचायत मंत्री तथा माजी काँग्रेस आमदार माविन गुदिन्हो यांनी सांगितले.