Thu, Jul 02, 2020 14:56होमपेज › Goa › ‘संजीवनी’त 2 लाखांच्या सुट्या भागांची चोरी

‘संजीवनी’त 2 लाखांच्या सुट्या भागांची चोरी

Published On: Jul 26 2019 1:48AM | Last Updated: Jul 26 2019 1:48AM
फोंडा : प्रतिनिधी

दयानंदनगर - धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील मशिनरीचे काही सुटे भाग चोरण्याचा प्रकार उघडकीस आला असून चोरलेल्या सुट्या भागांची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे. या चोरीप्रकरणी अजून रीतसर तक्रार नोंद झाली नसली तरी कारखाना व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांनी या चोरीसंबंधीची कल्पना फोंडा पोलिसांना दिली असून त्यानुसार तपास सुरू आहे. साखर कारखान्यातील चोरीचा हा प्रकार गेल्या सोमवारी सकाळी उघडकीस आला. शनिवारी संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित होते, पण सोमवारी सुटे भाग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले, असे कारखान्याच्या एका अधिकार्‍याने सांगितले. रविवार सुटीचा दिवस असल्याने नेमकी हीच संधी साधून चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली आहे.