Mon, May 25, 2020 14:31होमपेज › Goa › 'राज्‍याचे मुख्य निवडणूक कार्यालय बनले राजकीय कार्यालय'

'राज्‍याचे मुख्य निवडणूक कार्यालय बनले राजकीय कार्यालय'

Published On: Apr 12 2019 1:21PM | Last Updated: Apr 12 2019 1:07PM
पणजी : प्रतिनिधी

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय राजकीय कार्यालय बनले आहे. निवडणूक आचारसंहितेच्या उल्‍लंघन प्रश्‍नी तक्रार करुन देखील भाजपविरोधात कारवाई केली जात नाही, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते अ‍ॅड. रोहीत बाझ डिसा यांनी पत्रकार परिषदेत केला.

आचारसंहिता काळात दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्‍तीसंदर्भात दाखल करण्यात आलेली तक्रार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून फेटाळ्यात आली. मात्र त्याबाबत तक्रारदाराला कळवण्याची तसदी देखील घेण्यात आली नसल्याची टीका त्यांनी  केली.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्‍ती ही निवडणूक आचारसंहितेचे उल्‍लंघन ठरते, अशी तक्रार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे आपण 20 दिवसांपूर्वी केली होती. प्रत्यक्षात आचारसंहिता उल्‍लंघन तक्रारीवर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार 48 तासात निकाल देणे आवश्यक आहे. मात्र सदर तक्रारीवर  20 दिवसां नंतरही निकाल देण्यात आला नसल्याची टीका त्यांनी केली.