Thu, May 28, 2020 20:35होमपेज › Goa › काँग्रेस लोकशाही विचारधारा मानणारा पक्ष

काँग्रेस लोकशाही विचारधारा मानणारा पक्ष

Published On: Apr 11 2019 2:02AM | Last Updated: Apr 10 2019 11:24PM
म्हापसा : प्रतिनिधी 

काँगे्रस पक्ष हा लोकशाही विचारधारा मानणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. काँग्रेसमुक्त भारताचा नारा लावणार्‍यांचा या निवडणुकीत नामोनिशान मिटवा. लोकसभेच्या दोन्ही जागा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील तिन्ही जागांवर काँग्रेस पक्षाचाच विजय होऊन पुढील सरकार काँग्रेसचे बनणार असून काँग्रेसच सत्ता स्थापन करणार आहे, असा विश्‍वास विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी व्यक्त केला.

मरड-म्हापसा येथे म्हापसा मतदार संघाच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यालयाचे उद्घाटन ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते  तथा  माजी उत्तर गोवा अध्यक्ष डॉ.रामकृष्ण मोरजकर यांच्याहस्ते करण्यात आले. जाहिरनाम्यांचे प्रकाशन बाबू कवळेकर यांच्या हस्ते  झाल्यावर ते बोलत होते.

गटाध्यक्ष मिताली गडेकर, माजी नगराध्यक्ष आमिर्र्न ब्रागांझा, आमदार नीळकंठ हळर्णकर , उत्तर  गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, डॉ. रामकृष्ण मोरजकर, डॉ. प्रमोद साळगावकर, अ‍ॅड. सुभाष नार्वेकर, बाळू फडके, श्रद्धा खलप, माजी आमदार धर्मा चोडणकर, डॉ.गुरूदास नाटेकर, रमेश नाईक इत्यादी उपस्थित होते.

बाबू कवळेकर म्हणाले, की म्हापशाच्या  विकासाचे ध्येय बाळगून गेली 20 वर्षे म्हापशात वावरणार्‍या सुधीर कांदोळकरांची लोकप्रियता फार मोठी आहे. सर्व सामान्य लोक त्यांना मानतात. सर्व थरातील लोक त्यांच्या पाठीशी आहेत. 

शिवसेनेचे माजी प्रांत प्रमुख रमेश नाईक म्हणाले, की लोकशाही म्हणजे काँग्रेस तर विश्‍वासघात म्हणजे भाजपा असे नवे समीकरण आता सुरू आहे. काँगे्रसमुक्त भाजपची घोषणा  करणार्‍यांनी गोव्यात काँग्रेसयुक्त भारत घडवायला सुरूवात केली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानवर प्रत्यक्ष कृती करून दाखवली होती.  शिवसेनेच्या बोटाला धरून भाजप महाराष्ट्रात आला आणि आता शिरजोर होऊ पाहत आहे. हा विश्‍वासघातच आहे. म्हापशात सुधीर कांदोळकर यांच्या सारख्या प्रामाणिक व निष्ठा असलेल्यांचा  विश्‍वासघात त्यांनी  केला आहे. सुधीर कांदोळकरांची लोकप्रियता व साधेपणा यामुळे ते लोकांच्या पसंतीचे उमेदवार आहे.

मगोचे बाळू फडके म्हणाले, की सुधीर कांदोळकर यांच्या पाठीशी प्रदीर्घ अनुभव आहे.   सामाजिक कार्याची तळमळ आहे. सवार्ंपयर्ंत पोचणार्‍या सुधीरला समर्थन देण्याचा निर्णय म्हापसा मगा. पक्ष गटाने घेतला आहे. त्यामुळे मगोची मते त्यांना नक्की मिळणार आहेत.

आमदार नीळकंठ हळर्णकर म्हणाले,  की भाजप जनतेला वेठीस धरू पाहात आहे. काँगे्रसवर घराणेशाहीचा  शिक्का मारणार्‍यांनी शेवटी घराणेशाहीचाच आधार घेतला. सरकारच्या कार्याचा आधारापेक्षा त्यांनी सहानभुतीचा आधार घेण्यासाठी आमदार पुत्राला उमेदवारी दिली. त्यामुळे सुधीर कांदोळकर यांची वाट मोकळी झाली.

माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले, की सुधीर कांदोळकर नक्कीच निवडून येतील. आमदार झाल्यावर त्यांनी म्हापशाच्या विकासाचा आराखडा तयार करावा. त्याचा फायदा संपूर्ण उत्तर गोव्याला मिळेल. गोव्याच्या विकासाचे केंद्र म्हापसा शहर व्हावे, अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली.

काँगे्रसच्या माजी म्हापसा गटाध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर  म्हणाल्या, की भाजप चोरांची पार्टी आहे. काँग्रेस आणि  आता मगो चे आमदार त्यांनी चोरले आहेत. भाजपकडे स्वत:चे आमदार निवडून आणण्याची क्षमता नाही. म्हणून ही फोडाफोड सुरू आहे.आता म्हापशाच्या  पोटनिवडणुकीत विजय भिके यांनी मोठ्या मनाने आपल्या ऐवजी सुधीर कांदोळकर यांची शिफारस केली. त्यांचे कार्यकर्ते तसेच म.गो.पक्षाचे कार्यकर्ते  ,माजी नगराध्यक्ष आर्मिन ब्रागांझा, सुभाष नार्वेकर, मायकल कारास्को,माजी नगरसेवक दीपक महाडेश्री, आनंद भाईडकर,गुरूदास वायंगणकर, शुभांगी वायंगणकर यांचे कार्यकर्ते, श्रद्धा खलप व बाळू फडके यांचे समर्थन सर्व जण सुधीर कांदोळकरांच्या मागे उभे राहिले तर त्यांना यश मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी केली.

उमेदवार  सुधीर कांदोळकर  म्हणाले, की म्हापशातील लोक आणि  काँग्रेस पक्ष यांच्याशी प्रामाणिक राहिन. या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती व म्हापशातील नागरिकांसमोर दरवर्षी आपण कार्याचा अहवाल आवर्जून सादर करीन. जनतेची सेवा करताना पारदर्शकता आणि प्रशासनाच्या कामाबाबत आपल्या मनात गांभीर्य असेल. आपण कधीच विश्‍वासघात करणार नाही.

ज्येष्ठ कार्यकर्ते  डॉ. रामकृष्ण मोरजकर यांच्या हस्ते मरड येथील निवडणूक कार्यालयाचे फित कापून व नंतर इतर प्रतिष्ठितांच्या हस्ते दीप प्रज्वलन  करून उद्घाटन झाले. फा. डायलॉन डिकॉस्ता यांनी आशीर्वचन दिले.  स्वागत गटाध्यक्ष मिताली गडेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन रवींद्र फोगेरी यांनी केले.