Wed, Jul 15, 2020 22:20होमपेज › Goa › गोवा फॉरवर्डचे महत्त्व अबाधितच : सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे महत्त्व अबाधितच : सरदेसाई

Published On: Apr 25 2019 1:43AM | Last Updated: Apr 25 2019 12:09AM
मडगाव : प्रतिनिधी

गोव्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी गोव्याच्या राजकारणात गोवा फॉरवर्ड पक्षाचे महत्त्व किंचितही कमी होणार नसून वाढतच जाईल, असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केले  फातोर्ड्यातील दवंडे येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्‍त उद‍्गार काढले.  

गोव्यात नुकतेच लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूका झाल्या. या निवडणुकांचे निकाल काहीही लागले तरी गोवा फॉरवर्ड पक्षाचे महत्त्व कमी होणार नाही. पक्षाचे महत्त्व तसेच ताकद वाढत जाणार  आहे. या शिवाय गोवा फॉरवर्ड पक्ष हा मागे नव्हे तर फॉरवर्ड जाणारा पक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.