Mon, May 25, 2020 09:25होमपेज › Goa › अमलीपदार्थ प्रश्‍नी सरकार गंभीर कारवाई करणार

अमलीपदार्थ प्रश्‍नी सरकार गंभीर कारवाई करणार

Published On: Jul 23 2019 8:18PM | Last Updated: Jul 23 2019 8:18PM
पणजी : प्रतिनिधी

अमलीपदार्थ प्रश्‍नी सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात केले.अमलीपदार्थ व्यवसाय विषयी कुणालाही एखाद्यावर संशय असल्यास  नाव द्यावे. त्यावर नक्‍की कारवाई केली जाईल. मग तो पोलिस खात्यातील असला तरी असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात दिला. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यातील अमलीपदार्थ समस्येबाबत प्रश्‍नोत्तर तासात  प्रश्‍न  विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी  ही माहिती दिली.

आमदार कामत म्हणाले, अमलीपदार्थांविरोधात  करण्यात आलेल्या कारवाईत अटक केलेल्यांमध्ये   विदेशींबरोबर भारतीयांचा देखील आंकडा मोठा आहे.  मागील अडीच वर्षात करण्यात आलेल्या कारवाई 80 विदेशी व 400 भारतीयांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.त्यात  गोमंतकीय युवकांची संख्या चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सरकार अमलीपदार्थ प्रश्‍नी गंभीर असून या प्रकरणांच्या तपास टक्केवारीत वाढ झाली आहे.2017 साली अमलीपदार्थांच्या 168 प्रकरणे नोंद झाली होती त्यातील 137 प्रकरणांमध्ये न्यायालयात खटले सुरु आहेत. 2018 साली नोंद झालेल्या 222 प्रकरणांपैकी 151 तर 2019 साली नोंद झालेल्या 114 प्रकरणांपैकी 6 प्रकरणांत न्यायालयात खटले सुरु  असून उर्वरीत प्रकरणांत तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.