Thu, Jul 02, 2020 14:09होमपेज › Goa › विधानसभेत ‘क्रीडा’, ‘पर्यटन’च्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा

विधानसभेत ‘क्रीडा’, ‘पर्यटन’च्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा

Published On: Jul 22 2019 2:02AM | Last Updated: Jul 22 2019 2:02AM
पणजी : प्रतिनिधी 

विधानसभेच्या अधिवेशनात सोमवारी (दि.22) क्रीडा आणि पर्यटन खात्यावरील पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार असून पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांना सोमवारी विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्याच्या कामकाजाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. मगोचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी गेल्या आठवड्यात मांडलेली आणि पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना सोमवारी घेतली जाणार आहे. राज्यात मुसळधार पावसाने अनेक भागांत पूरसद़ृश स्थिती निर्माण झाली असून मांडवी, जुवारी, वाळवंटी, डिचोली भागातील गावांतील  लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक भागात झाडे घरांवर, रस्त्यावर आणि मंदिरांवर पडल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत राज्य सरकारकडून काय उपाययोजना हाती घेतली आहे, याची माहिती देण्याची मागणी ढवळीकर यांनी या सूचनेत केली आहे.

विधानसभेत सोमवारी छापखाना, राजभाषा, सार्वजनिक तक्रारी, क्रीडा व युवा व्यवहार आणि पर्यटन या खात्यावर चर्चा होणार आहे. या खात्यावरील अनुदान कमी करण्यासाठी विरोधकांकडून सरकार टीकास्त्र सोडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.