Thu, May 28, 2020 19:57होमपेज › Goa › चार दुरुस्ती विधेयके सादर

चार दुरुस्ती विधेयके सादर

Published On: Jan 31 2019 1:30AM | Last Updated: Jan 30 2019 11:11PM
पणजी : प्रतिनिधी

महत्त्वाच्या विधेयकांमध्ये आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी गोवा अनुसूचित जाती व जमाती आयोग 2019 दुरुस्ती  विधेयक मांडले. हे दुरुस्ती विधेयक  सभागृहात आवाजी मतदानाने समंत करण्यात आले.  पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी गोवा राज्य पर्यटन नोंदणी दुरुस्ती विधेयक 2019 सभागृहात मांडले. गोवा पर्यटन स्थळे संरक्षण आणि देखभाल दुरुस्ती  विधेयक 2019  देखील मांडण्यात आले. 

मंत्री विश्‍वजित राणे यांनी गोवा सार्वजनिक आरोग्य दुरुस्ती  विधेयक 2019 सभागृहात मांडले. सर्व विधेयके आवाजी मतदानाने संमत करण्यात आली. मुख्यमत्री मनोहर पर्रीकर यांनी कामकाज सल्लागार समितीचा अहवाल सभागृहात मांडला. अनुदानित पुरवण्या मागण्या दुसरा गट 2018-19  सभागृहात मांडला.  गोवा विनियोग विधेयक 2019 देखील मांडण्यात आले. आवाजी मतदानाने आमदारांनी विधेयक संमत केले.