Fri, May 29, 2020 21:42होमपेज › Goa › ईडीसी अध्यक्षपदी सुभाष शिरोडकर 

ईडीसी अध्यक्षपदी सुभाष शिरोडकर 

Published On: Nov 01 2018 1:07AM | Last Updated: Nov 01 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

माजी आमदार सुभाष शिरोडकर यांची गोवा आर्थिक  विकास महामंडळा(ईडीसी)च्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आल्याची माहिती  सूत्रांनी दिली. यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काल   बुधवारी  जारी केली. त्याचबरोबर पणजीचे माजी आमदार  सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी  29 ऑक्टोबर रोजी दिलेला ईडीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सरकारने स्वीकारला आहे.  

सुभाष शिरोडकर  व दयानंद सोपटे यांनी दोघा माजी आमदारांनी   काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप  मध्ये प्रवेश केला होता. त्यानुसार  शिरोडकर यांची आता सरकारकडून  ईडीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे.