Wed, May 27, 2020 19:03होमपेज › Goa › आंदोलकांचा पर्रीकरांना ४८ तासांचा ‘अल्टीमेटम’

आंदोलकांचा पर्रीकरांना ४८ तासांचा ‘अल्टीमेटम’

Published On: Nov 21 2018 12:43PM | Last Updated: Nov 21 2018 12:43PMपणजी : पुढारी ऑनलाईन 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना १४ ऑक्टोबरला एम्समधून गोव्याला हलवण्यात आले होते. तेव्हापासून ते आपल्या खासगी निवासस्थानत उपचार घेत आहेत. पण, गोव्यातील काही एनजीओ आणि विरोधी पक्षांनी मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे पद सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. 

गेल्या ९ महिन्यांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठिक नाही आहे. या संदर्भात ते उपचार घेत आहेत. पर्रीकर हे आपल्या कार्यालयात गेलेले नाहीत. यामुळेच आज काही सामजिक संस्थांनी पर्रीकरांच्या खासगी निवास्थानावर मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सामिल झाले होते. हा जरी नागरिकांचा मोर्चा मोर्चा म्हणून संबोधण्यात येत असला तरी त्याला काँग्रेससह  राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलकांच्या मते आजारी असल्यामुळे पर्रीकर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडू शकत नाहीत. त्यामुळे गोव्याचे प्रशासन कोलमडले आहे. गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्र्याची गरज आहे. त्यामुळेच त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. यासाठी आंदोलकांनी पर्रीकरांना ४८ तासाची मुदत दिली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी या मोर्चाला पर्रीकरांचा निवास्थानाच्या १०० मिटर आधी रोखले. पर्रीकरांनी आंदोलकांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे भटेण्यास नकार दिला आहे.