Wed, May 27, 2020 17:05होमपेज › Goa › श्रीपाद नाईक यांनी घेतली संस्कृतमधून शपथ 

श्रीपाद नाईक यांनी घेतली संस्कृतमधून शपथ 

Published On: Jun 17 2019 2:47PM | Last Updated: Jun 17 2019 2:47PM
पणजी : प्रतिनिधी 

उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आयुष्य (स्वतंत्र विभाग) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी सतराव्या लोकसभेच्या पहिल्या दिवशी सदस्यत्वाची संस्कृतमधून शपथ घेतली. नाईक यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

लोकसभेचे हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनला सोमवारी सुरुवात झाली. त्यावेळी नव्या सदस्यांना शपथ ग्रहण करण्याचा विधी पार पाडण्यात आला. नाईक यांनी शुद्ध संस्कृतमधून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व सभागृहाने टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले. हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनीही नाईक यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.