Mon, May 25, 2020 11:21होमपेज › Goa › श्रीपाद नाईक यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी 

श्रीपाद नाईक यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी 

Published On: May 30 2019 3:17PM | Last Updated: May 30 2019 3:19PM
पणजी : प्रतिनिधी 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपली मागील कामगिरी पाहून मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे. हा गोमंतकीयांचा व खास करून उत्तर गोवा मतदारांचा सन्मान आहे. केंद्रीय मंत्रिपदामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी पडली असून, सर्वांच्या सहकार्याने आपण पुढे जाणार असल्याचे उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले. 

गोव्यातून भाजपचे एकमेव निवडून आलेले खासदार श्रीपाद नाईक यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात नेमके कोणते मंत्रालय मिळणार हे संध्याकाळी शपथविधीच्या वेळी जाहीर होणार आहे. नाईक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल गोव्यातील मंत्री, आमदार, भाजप कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी आनंद व्यक्त केला आहे. या वार्तेमुळे गोव्यातील अनेक कार्यकर्ते आणि श्रीपादभाऊ नाईक यांचे नातेवाईक, मित्रांनी दिल्लीत शपथविधीला हजर राहण्यासाठी धाव घेतली.