Fri, May 29, 2020 22:42



होमपेज › Goa › गोवा : शिवसेनेच्या उदय मांद्रेकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

गोवा : शिवसेनेच्या उदय मांद्रेकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Published On: Mar 07 2019 8:35PM | Last Updated: Mar 07 2019 8:35PM




पणजी : प्रतिनिधी

तुये पंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उत्तर गोवा अध्यक्ष उदय मांद्रेकर यांनी गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षाने भाजपकडे युती केली. ही युती कुणालाही विश्‍वासात न घेताच केल्याने शिवसेना सोडण्याचा  निर्णय घेतला असल्याचे यावेळी मांद्रेकर यांनी सांगितले.

मांद्रेकर म्हणाले, मागील २० वर्षापासून आपण समाजकार्य तसेच राजकारणात कार्यरत आहे. तर मागील १० वर्षांपासून मांद्रे पंचायतीत प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र शिवसेनेकडून महाराष्ट्रात भाजपकडे युती करण्यात आली आहे. ही युती करताना कुणालाही विश्‍वासात घेण्यात आले नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी बाबी बागकर व अन्य उपस्थित होते.