Tue, May 26, 2020 08:54होमपेज › Goa › 'गोव्यातील राजकारण बाजार झालाय' 

'गोव्यातील राजकारण बाजार झालाय' 

Published On: Jul 11 2019 12:30PM | Last Updated: Jul 11 2019 12:22PM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील राजकारण म्हणजे बाजार झाला आहे. काँग्रेसचे 10 आमदार भाजपमध्ये जाणे म्हणजे व्यवसाय झाला असल्याची टीका शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

नवीन राजकीय घडामोडी म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि मतदारांची नेत्यांकडून होत असलेली चेष्ठा आहे. जे कार्यकर्ते दिवस रात्र स्वतःच्या नेत्यांसाठी राबून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कार्य करतात त्यांच्या भावनांची पायमल्ली करणारी ही घटना आहे, अशी खरमरीत टीका कामत यांनी केली आहे. 

कोणत्याही पक्षाची लोकप्रियता हे त्या पक्षाच्या नेत्यांच्या चारित्र्यावर अवलंबून असते. ज्या घोटाळेबाज आणि भ्रष्ट नेत्यांनी काँग्रेस पक्षाची लोकप्रियता घटवली तेच नेते आज भाजप मध्ये आहेत. त्‍यामुळे यापुढे गोव्यातील जनतेने काँग्रेस, भाजप आणि प्रस्थापित राजकारण्यांना गोव्याच्या राजकारणातून हद्दपार करुन दमदार तरूण नेत्यांना  निवडून आणण्याची गरज आहे, असे मत कामत यांनी व्यक्‍त केले आहे.

शिवसेना पक्षाकडे नवीन पर्याय म्हणून पाहिले पाहिजे नाही तर मुल्याधिष्ठीत आणि आदर्शवादी राजकारणापासून पुढील पिढीला वंचित राहावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.