Wed, May 27, 2020 04:11होमपेज › Goa › कोरोना विषयक अ‍ॅपला प्रतिसाद

कोरोना विषयक अ‍ॅपला प्रतिसाद

Last Updated: Mar 22 2020 11:17PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

आरोग्य खात्याने शनिवारपासून सुरू केलेल्या ‘स्वत: चाचणी घ्या, गोवा’ (टेस्ट युवरसेल्फ, गोवा) या मोबाईल अ‍ॅपला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एका दिवसात 10 हजार लोक या उपक्रमात सहभागी झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी रविवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून दिली.

‘कोरोना व्हायरस’संबंधी अधिक माहिती मिळावी म्हणून आरोग्य खाते आणि ‘इनोव्हेसर’ कंपनीच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याहस्ते अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. या आधुनिक आणि डिजीटल उपक्रमाद्वारे ‘कोरोना व्हायरस’संबंधी गैरसमज दूर होऊन त्याचा प्रसार रोखण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या अ‍ॅपला लोकांकडून व खास करून गोमंतकीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याबद्दल राणे यांनी रविवारी लोकांचे आभार मानले.