Wed, May 27, 2020 05:27होमपेज › Goa › ‘मगो’विषयी माहितीसाठी निवडणूक आयोगाला विनंती

‘मगो’विषयी माहितीसाठी निवडणूक आयोगाला विनंती

Published On: Apr 30 2019 1:55AM | Last Updated: Apr 30 2019 12:38AM
पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाविषयी माहिती द्यावी, अशा आशयाचा हक्‍क कायद्यांतर्गत अर्ज सदानंद वायंगणकर यांनी निवडणूक आयोगाकडे सोमवारी सादर केला आहे. 

या अर्जात वायंगणकर यांनी मगो पक्षाने मुख्य निवडणूक आयोगाकडे कोणत्या तारखेला नोंदणी केली, पक्षाच्या घटनात्मक दुरुस्तींना मंजुरी देण्यात आली आहे का? याविषयी माहिती मागितली आहे. त्याचबरोबर त्यांनी 1972 सालापासूनच्या मगो पक्षाच्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी तसेच केंद्रीय समितीच्या विद्यमान पदाधिकारी व पक्षाच्या सदस्यांची यादी मागितली आहे. 1 जानेवारी 2000 पासून पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकारी तसेच सदस्यांची त्यांच्या पत्त्यानुसार यादीही या अर्जाद्वारे मागण्यात आली आहे.

गोवा विधानसभेच्या नोंदीप्रमाणे मगो पक्षाचे 27 मार्च 2019 मध्ये विलिनीकरण करण्यात आले. त्यानुसार याबाबत या विलिनीकरणाची माहिती निवडणूक आयोगाला कधी समजली व त्याबाबतची कागदपत्रे द्यावीत, मगो पक्षाची सध्याची स्थिती काय आहे? या विलिनीकरणाबाबतची माहिती, मगो पक्षाच्या विलिनीकरणपूर्वी व नंतर अन्य राजकीय पक्षांची स्थिती, मगो पक्षाच्या विलिनीकरणानंतर निवडणूक आयोगाची कृती याबाबत वायंगणकर यांनी आरटीआय अंतर्गत माहिती अर्जात मागितली आहे. 

वायंगणकर यांनी ‘मगो’पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले मंत्री बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अपात्रता याचिका दाखल केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सभापती मायकल लोबो तसेच मंत्री आजगावकर व मंत्री पाऊसकर यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.