Tue, May 26, 2020 05:08होमपेज › Goa › राजनाथ सिंह, गडकरी प्रचारासाठी गोव्यात येणार

राजनाथ सिंह, गडकरी प्रचारासाठी गोव्यात येणार

Published On: Apr 03 2019 1:44AM | Last Updated: Apr 03 2019 12:20AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील लोकसभा  तसेच विधानसभेच्या तीन पोटिनिवडणूकांच्या प्रचारासाठी गोव्यात भाजपचे स्टार प्रचारक येणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा  यांच्यासह  केंद्रीय मंत्र्याचा समावेश  असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्रीय मंत्र्यांमध्ये  गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री  स्मृती ईराणी यांचा समावेश असून या सर्वांच्या गोव्यात  जाहीरसभा तसेच रॅली  होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.   

गोव्यात लोकसभा तसेच मांद्रे, शिरोडा व म्हापसा पोटनिवडणूकीसाठी  23 एप्रिल रोजी  मतदान  होणार आहेत. गोव्यात लोकसभेच्या उत्तर व दक्षिण गोवा अशा  दोन जागा असून सध्या या दोन्ही जागांवर भाजपचे खासदार आहेत.  त्यामुळे या दोन्ही जागा काबीज करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या प्रचार मोहीमांना  पुढील आठवडयापासून सूरवात होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची शुक्रवार12 एप्रिल रोजी  प्रचार सभा होईल. मात्र त्यासाठीची जागा अजूनही निश्‍चित करण्यात आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोटनिवडणूका होणार्‍या    शिरोडा व म्हापसा मतदारसंघात  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या  रॅली होणार आहेत. याशिवाय केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री  स्मृती ईराणी यांच्याही  प्रत्येकी दोन जाहीर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.