Thu, May 28, 2020 20:25होमपेज › Goa › प्रियांका गांधींच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी 

प्रियांका गांधींच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळकटी 

Published On: Jan 24 2019 1:27AM | Last Updated: Jan 24 2019 1:27AM
मडगाव : प्रतिनिधी 

प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात येणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे .प्रियांका गांधी आणि राहूल गांधी यांनी एकत्र यावे,अशी सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती,ती  पूर्ण झाली आहे.प्रियांका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे पक्ष संघटन आणखी  मजबूत झाले आहे, असे प्रतिपादन मडगाव चे आमदार दिगंबर कामत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केले.

नगरसेवक अविनाश शिरोडकर, डोरिस टेक्सरा,माजी नगरसेवक दामू शिरोडकर व इतर उपस्थित होते.जेडीयूचे प्रशांत किशोर यांनीही प्रियांका गांधी यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.भारतीय राजकारणात हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे कामत म्हणाले. प्रियांका गांधी यांच्यांत इंदिरा गांधी यांची छबी दिसून येते.यापूर्वी त्यांनी आपले काम अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघापुरते सीमित ठेवले होते.राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठीच त्या प्रचार करत होत्या.मडगाव काँग्रेस गटाच्या वतीने आणि काँग्रेसचा माजी मुख्यमंत्री या नात्याने आपण प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी झालेल्या निवडीचे स्वागत करत असल्याचे कामत म्हणाले.

प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यास काँग्रेस आणि राहुल गांधी यांना त्याचा नक्कीच लाभ होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तीन मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर प्रियांका गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रियांका  आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांना उत्तर प्रदेशातील देण्यात आलेले काम अत्यंत आव्हानात्मक आहे, असे  सांगून कामत म्हणाले.त्यांनी  संपूर्ण देशभर पक्षाची जबाबदारी घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. सध्या त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील जबाबदारी देण्यात आली असली तरी त्या संपूर्ण देशभर काम करतील, असा विश्‍वास कामत यांनी व्यक्त केला. आपण मुख्यमंत्रीपदी असतांना अनेक वेळा त्यांची भेट घेतली आहे.त्यांचे काम आपण फार जवळून अनुभवले आहे, असे ते म्हणाले.

मडगाव शहरात सांडपाणी वाहिनी कार्यान्वित झालेली आहे.सुमारे 380 घरांना जोडणी देण्यात आलेली आहे, पण इतर घरांंनी आणि खास करून व्यावसायिक इमारतींनी लवकरात लवकर जोडणी घ्यावी, असे आवाहन कामत यांनी केले आहे.जोडणी घेण्यासाठी जाहिरातबाजी करण्यात आलेली आहे. नगरसेवक  जनजागृती करत आहेत.30 जानेवारीपर्यंत सर्व पालिका स्वच्छतागृहे सांडपाणी वाहिनीला जोडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.त्याशिवाय सुलभ शौचालय आणि शैक्षणिक संस्थांनासुद्धा जोडणी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती कामत यांनी दिली.