Wed, May 27, 2020 11:22होमपेज › Goa › पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

पंतप्रधान मोदींकडून नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

Published On: Mar 19 2019 2:30PM | Last Updated: Mar 19 2019 2:56PM
पणजी : प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण शुभेच्छा देत आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात गोव्याच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचे आवाहन केले. गेल्या काही वर्षात राज्यात केलेल्या विकासकामांची गती भविष्यात अधिकाधिक वाढ घेईल, अशी आशाही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्‍त केली. 

वाचा : डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

वाचा : 'डॉक्टर ते मुख्यमंत्री व्हाया सभापती'