Sun, May 31, 2020 14:58होमपेज › Goa › पंतप्रधान मोदींची महत्त्वाच्या प्रश्‍नांना बाजूला ठेवले

पंतप्रधान मोदींची महत्त्वाच्या प्रश्‍नांना बाजूला ठेवले

Published On: Apr 12 2019 2:03AM | Last Updated: Apr 11 2019 11:55PM
पणजी : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबोळी येथील सभेत महत्वाच्या प्रश्‍नांना बगल देत जनतेला केवळ पोकळ आश्‍वासने दिली,अशी टीका काँग्रेसचे प्रवक्‍ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च न्यायालयात राफेल लढाऊ विमान करारप्रश्‍नी महत्वाची सुनावणी झाली. मात्र, राफेल सारख्या  विषयावर देखील बोलणे त्यांनी टाळले, अशी टीकाही त्यांनी केली.

डिमेलो म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी जाहीरसभा बांबोळी येथे पार पडली. परंतु या सभेत त्यांनी  ठोस असे कसलेच आश्‍वासन जनतेला दिले नाही.   राफेलप्रश्‍नी केंद्र सरकारने सीबीआयपासून  जवळपास सर्वच यंत्रणांवर दबाव टाकला. मात्र,  सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकारच्या राफेल संदर्भात  कानपिचक्या दिल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेचे काँग्रेस पक्ष स्वागत करीत असल्याचे त्यांनी  सांगितले.

राफेल विषयावरुन केंद्र सरकारने  प्रसारमाध्यमांवरदेखील दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी ना राफेलवर तसेच नोटाबंदी या सारख्या महत्त्वाच्या  विषयावर एक  अक्षरही काढले नाही.  सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांचा प्रचार करण्यासाठी विविध गोष्टींचा वापर केला जात आहे. यात क्‍लिपिंग व त्यांच्या जीवनपटाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने यावर करडी नजर ठेवून त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही डिमेलो यांनी  केली.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते उर्फान मुल्‍ला म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गोव्याच्या जनतेला बर्‍याच अपेक्षा होत्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या  गोव्यातील प्रचार सभेत  मोदी यांनी गोमंतकीयांना अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र, गोव्यातील  बुधवारच्या सभेत  त्यांनी आश्‍वासने देणे टाळले.  मोदी यांनी दलबदलूंवर टीका केली. प्रत्यक्षात त्यांना  दलबदलू या विषयावर बोलण्याचा कसलाच अधिकार नाही, कारण भाजपमध्ये देखील अन्य पक्षातील आमदारांना प्रवेश देण्यात आला असल्याची टीका त्यांनी  केली. 

राफेल फाईल्सचे भूत  सध्या भाजपच्या मानगुटीवर बसले आहे. या  फाईल्सचा वापर माजी संरक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांचे कुटुंबीय भाजपवर दबाव टाकण्यासाठी पणजी पोटनिवडणुकीत वापरु शकतात, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्‍ते ट्रोजन डिमेलो यांनी केला. भाजपने पणजी पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, असेही त्यांनी सांगितले.