Wed, May 27, 2020 18:32होमपेज › Goa › प्रवीण ब्लेगन काँग्रेसमध्ये दाखल

प्रवीण ब्लेगन काँग्रेसमध्ये दाखल

Published On: Apr 01 2019 1:06AM | Last Updated: Mar 31 2019 11:56PM
डिचोली : प्रतिनिधी

भाजपाला सत्तेची चटक लागलेली असून खुर्ची टिकवण्यासाठी आमदार फोडून सर्व मार्ग अवलंबून सत्ता टिकवणे व तेही जनतेने पूर्णपणे झिडकारलेले असताना हीबाब जनता ओळखून असून संधी मिळताच भाजपचा मोरया करण्यास जनता सक्षम आहे आज मागील दाराने सत्ता घेऊन खाण अवलंबिताना फसवून बेकारी लादून भाजप सपशेल उघड झाला आहे आगामी काळात जनतेचा उद्रेक होणार असून सर्व गोष्टी उघड होणार असल्याचे  प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष गिरीश चो डं ण कर यांनी काल साखळीत केले. 

साखळीचे माजी सरपंच प्रवीन ब्लेगंन नगरसेविका ज्योती ब्लेगं न व इतरांनी काळ काँग्रेस पक्षात प्रवेश केले. या वेळी  डेलमन हॉटेल मध्ये आयोजित कार्यक्रमास नगराध्यक्ष धर्मेश सागलानि, माजी आमदार प्रताप गावास सुनीता वेरेकर, रियाझ खान व इतर नगरसेवक उपस्तीत होते. 

प्रावीन ब्लेगन यांनी भाजपने दिशाभूल केली असून जनता सर्व गोष्टींचा हिसाब देणार आहे जनतेचा काँग्रेस ला मोठा पाठिंबा असून लोकसभेत विजय निश्‍चित आहे असे सांगितले. या वेळी ब्लेगन व इतर सदस्यांना काँग्रेस मध्ये रीतसर प्रवेश देण्यात आला. धर्मेश सागलानी यांनी काँग्रेस सत्तेवर घेणे गरजेचे असून भाजपामुळे विकास थंड झाला आहे खाण बंदीने सवा लाख लोक बेकार आहेत असे सांगून अनेकांनी काँग्रेस प्रवेश केल्याने साखळीत काँग्रेस मजबूत होणार असे सांगितले. यावेळी खेमलो सावंत  सुनीता वेरेकर आदींनी विचार मांडले.