Fri, May 29, 2020 21:48होमपेज › Goa › फुटिर आमदारांना जनताच धडा शिकवणार 

फुटिर आमदारांना जनताच धडा शिकवणार 

Published On: Oct 17 2018 1:36AM | Last Updated: Oct 17 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

भाजप नेते सत्तेसाठी हपापले आहेत.   सत्ताधार्‍यांनी पैसा, केंद्रातील सत्ता  व  यंत्रणेचा गैरवापर करून  काँग्रेसचे दोन आमदार त्यांनी   फोडले असा  आरोप करून   विरोधी पक्षनेते   बाबू कवळेकर यांनी  फुटीर आमदारांना जनताच धडा शिकवेल,असा इशारा मंगळवारी आल्तिनो येथील  शासकीय  निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.राज्यातील विद्यमान राजकीय स्थितीवर  सध्या काँग्रेस लक्ष ठेवून आहे.  काँग्रेसचे उर्वरित 14 आमदार  एकसंध असल्याचेही  त्यांनी सांगितले.

कवळेकर म्हणाले,  विद्यमान   भाजप युती सरकारला   लोकशाही पध्दतीने   सरकार चालवायचे नाही. भाजप नेते सत्तेसाठी   हपापले आहेत.   भाजपला बहुमत नसताना देखील मागील दाराने त्यांनी  सरकार स्थापन केले.   केंद्रातील सत्ता व  बळाचा गैर वापरून   सरकार स्थापन केले. मात्र  दीड वर्षातच या सरकारची काय स्थिती झाली, हे दिसून येत आहे. सरकार असून नसून सारखेच असल्याची टीकाही  त्यांनी केली.

भाजपकडे बहुमत नाही. बहुमत सिध्द करण्याची संधी द्यावी, अशी चार वेळा  राज्यपालांकडे काँग्रेसने मागणी केली. परंतु त्याला काहीच प्रतिसाद त्यांनी दिला नाही. भाजप सत्ता कायम ठेवण्यासाठी  काहीही करू शकतो.  त्यांनी काँग्रेसचे दोन आमदार फोडले. मात्र जनतेला सर्व ठाऊक आहे.  काँग्रेसचे हे दोन्ही आमदार कुठल्या गोष्टीला बळी पडले, ते  माहिती नाही. मात्र   जनता त्यांना  धडा शिकवणार हे नक्की.त्यांना जनताच घरचा रस्ता दाखवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.काँग्रेसचे सर्व 14 आमदार  एकत्र असून  राज्यातील राजकीय स्थितीवर काँग्रेसने लक्ष ठेवले आहेत. त्यानुसार लवकरच पुढील कृतीची घोषणा केली जाईल. बहुमत सिध्द करण्याची काँग्रेसला पुन्हा एकदा संधी द्यावी. गोवा विधानसभा बरखास्त  करु नये, ही काँग्रेसची मागणी कायम असल्याचेही  कवळेकर यांनी सांगितले.