Thu, May 28, 2020 06:25होमपेज › Goa › सशर्त परवानगीने पणजीत व्यापारास सुरुवात 

सशर्त परवानगीने पणजीत व्यापारास सुरुवात 

Last Updated: May 08 2020 2:06AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

पणजी येथील नवे मार्केट गुरुवापरसून अखेर ४३ दिववसांनी पुन्हा एकदा खुले झाले. मार्केटमध्ये एकाच वेळी केवळ ५० ग्राहकांनाच सोडले जात आहे. त्याचबरोबर मास्क न वापरणार्‍या ग्राहक तसेच दुकानदारांना दंड ठोठावला जाणार असल्याचे मनपा महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले. 

अधिक वाचा : पणजी : दहावीची परीक्षा 21 मे पासून सुरू

नव्या मार्केटमधील सर्व दुकाने खुली करण्यात आली आहे. ग्राहक तसेच दुकानदारांकडून मास्कचा वापर तसेच सुरक्षित अंतर राखले जात आहे का याचे काटेकोरपणे पालन होत आहे का हे पाहण्यासाठी मनपाचे पथक मार्केटमध्ये नेमण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : सडा येथे घराच्या गच्चीवरून पडून विद्यार्थिनी ठार

लॉकडाऊन काळात सुमारे ४३ दिवस बाजार बंद राहिल्यानंतर पणजीचे नवे मार्केट खुले करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मार्केट खुले करण्यात आले आहे. मार्केट खुले झाल्याने ग्राहक तसेच व्यापार्‍यांमध्ये देखील समाधान व्यक्‍त केले जात आहे. अनेक व्यापार्‍यांनी कित्येक दिवसांपासून दुकाने बंद असल्याने दुकानांमध्ये बरीच धुळ साचली होती. त्यामुळे दुकानांची स्वच्छता करुन व्यापाराला सूरवात केली.