Fri, May 29, 2020 22:58होमपेज › Goa › उत्‍तर प्रदेशच्या बनावट मंत्र्याचा गोव्यात सरकारी पाहुणचार!

उत्‍तर प्रदेशच्या बनावट मंत्र्याचा गोव्यात सरकारी पाहुणचार!

Last Updated: Jan 12 2020 1:07AM
पणजी : प्रतिनिधी 

गोव्यात येऊन सरकारी पाहुणचार झोडणार्‍या उत्तर प्रदेशमधील बनावट मंत्र्या प्रकरणी भाजप सरकारने माफी मागावी अशी मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिमा  कुतिन्हो यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केली. या प्रकरणामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न एरणीवर आल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची उच्च  स्तरीय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

अधिक वाचा : गेलकडून पाकिस्तानची पाठराखण! पण कशासाठी?

कुतिन्हो म्हणाल्या, राज्यातील भाजप सरकार म्हणजे सध्या थट्टेचा विषय बनला आहे. उत्तर प्रदेश येथील मंत्री असल्याचे सांगून बनावट व्यक्‍तीने सरकारी पाहुणचार झोडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे राज्यातील गुप्‍तचर विभागाचे अपयश दिसून आल्‍याची टीका त्‍यांनी केली. करदात्यांच्या पैशावर अशा प्रकारे  बनावट मंत्र्यांनी येऊन मजा केली मात्र याचा सरकारला थांगपत्ता देखील लागला नाही ही गोष्‍ट योग्‍य नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.