Mon, May 25, 2020 11:38होमपेज › Goa › मांडवी तिसर्‍या पुलाचे नितीन गडकरींच्या हस्ते रविवारी उद्घाटन

मांडवी तिसर्‍या पुलाचे नितीन गडकरींच्या हस्ते रविवारी उद्घाटन

Published On: Jan 23 2019 2:14PM | Last Updated: Jan 23 2019 2:14PM
पणजी : प्रतिनिधी

मांडवी नदीवरील तिसर्‍या नव्या केबल स्टेड पुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 27 जानेवारी रोजी होणार आहे. याच दिवशी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर गोव्याच्या भाजप  कार्यकर्त्यांकडे व्हीडीओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत, असे  भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मांडवी नदीवरील तिसर्‍या  पूलाचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात तो पूल राज्य सरकारच्या ताब्यात दिला जाणार आहे असे गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी याआधीच सांगितले होते. मांडवी पूलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले होते. मात्र त्यांना वेळ मिळत नसल्याने आता नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या रविवारी उद् घाटन केले जाणार असल्याचे तेंडुलकर म्हणाले.