Thu, May 28, 2020 07:32होमपेज › Goa › पणजी मनपाकडून निर्जंतुकीकरणास सुरूवात

पणजी मनपाकडून निर्जंतुकीकरणास सुरूवात

Last Updated: May 09 2020 2:06AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

पणजी महानगरपालिकेकडून आता शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. याची सुरुवात मनपाने पणजीतील मळा आणि कांपाल परिसरापासून सुरूवात केली असल्याची माहिती पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

अधिक वाचा : 194 रेशन दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस

येणाऱ्या काही दिवसांत संपूर्ण पणजी शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. ही मोहित टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनतेने सुरक्षित रहावे यासाठी मनपाकडून ही पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सरकारी कार्यालये तसेच मार्केट सुरु झाली आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर मनपाकडून या सरकारी कार्यालयांचे तसेच मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. मात्र सार्वजनिक ठिकाणांचे अद्याप निर्जंतुकीकरण करण्यात आले नव्हते. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर लोक देखील मोठया संख्येने घराबाहेर कामानिमित पडू लगले आहे. 

अधिक वाचा : मंत्री लोबो, आजगावकर वादात मुख्यमंत्र्यांची शिष्टाई

अशा स्थितीत कुणालाही कोरोनाची बाधा तसेच अन्य आरोग्याच्या तक्रारी होऊ नये यासाठी  आता  मनपाकडून आता सार्वजनिक  तसेच वर्दळीच्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवार रात्री पासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.