Tue, May 26, 2020 08:21होमपेज › Goa › गोवा : पणजी चर्च फेस्त उत्साहात 

गोवा : पणजी चर्च फेस्त उत्साहात 

Last Updated: Dec 10 2019 1:25AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी येथील मेरी ईमॅक्यूलेट कन्सेप्शन चर्चचे फेस्त आज उत्साहात साजरे झाले. सकाळी मुख्य प्रार्थना सभा पार पडली. नंतर पारंपारीक आणि धार्मिक पद्धतीने सायबीणीची चर्च चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यात चर्चचे धर्मगुरु आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायबीणीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

चर्चवर केलेली विद्युत रोषणाई लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. जुने गोवे येथील सेंट फ्रांसिस झेव्हियर फेस्त झाले की ८ डिसेंबरला सर्वात पहिले पणजी चर्चचे फेस्त होते. यावेळी ८ डिसेंबर रविवारी आल्याने आज ९ डिसेंबर रोजी हे फेस्त साजरे करण्यात आले.