होमपेज › Goa › गोवा : ४ कोटींच्या अमली पदार्थासह दोघांना अटक 

गोवा : ४ कोटींच्या अमली पदार्थासह दोघांना अटक 

Published On: Jun 14 2018 2:46PM | Last Updated: Jun 14 2018 3:31PM पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील एका बंद असलेल्या फॅक्टरीत दिल्लीतील महसूल दक्षता खात्याच्या पथकाने धाड टाकली. यामध्ये ४ कोटी रूपयांच केटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या सोबतच परदेशी नागरिकासह एका युवकाला अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या 4 कोटी रुपयांच्या केटामाईन साठ्याप्रकरणाची चौकशी गतिमान झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सदरचे रॅकेट आंतरराष्ट्रीय असून, हा व्यवहार दक्षिण आफ्रिका तसेच कॅनडातून हाताळला जात असल्याचे पुढे आले आहे. दरम्‍यान या चौकशीत अँन्थोनी पॉल या ब्रिटनच्या इसमासह मुंबईतील सचिन शेवडे या युवकाला अटक करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे.