Mon, Sep 16, 2019 12:34होमपेज › Goa › ‘पीएफ’उपायुक्‍ताला ५ हजारांची लाच घेताना अटक

‘पीएफ’उपायुक्‍ताला ५ हजारांची लाच घेताना अटक

Published On: Jan 01 2019 1:50AM | Last Updated: Jan 01 2019 1:50AM
पणजी : प्रतिनिधी

भविष्य निर्वाह निधी (पीएफ)कार्यालयाचे उपायुक्‍त रवींद्रनाथ रॉय यांना कंत्राटदाराकडून  5 हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी सीबीआय अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. आपल्याविरोधातील  कारवाई  टाळण्यासाठी   कंत्राटदाराने रॉय यांना ही लाच देऊ केली होती. कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्याचा रॉय यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु याविषयी सीबीआयकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली.

दुपारी पीएफ कार्यालयात सीबीआयच्या कर्मचार्‍यांनी सापळा रचून रॉय यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. पीएफ कार्यालयात अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तेथील कर्मचार्‍यांमध्ये एकच गोंधळ उडाला. संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.