Wed, May 27, 2020 05:10होमपेज › Goa › अरे, ये तो हमारे जैसे ही भाय!

अरे, ये तो हमारे जैसे ही भाय!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : अभिजीत रांजणे 

राजधानी पणजीत गेली आठ दिवस सुरू असलेल्या 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आपल्या आवडत्या अभिनेत्यांना पाहून लोक ’अरे ये तो हमारे जैसे ही भाय!’ असे म्हणतं आंनदित होत असतं.

गोव्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफफ ी) नेहमीच आयोजनकांनी प्रत्येकवर्षी लोकांना भावेल, लोकांच्या नजरेत बसेल, मनोरंजनही होईल, या भावनेतून अनेक कार्यक्रम दिलेत. यावर्षीही चित्रपट महोत्सवात ‘कट्टा’ या संकल्पनेच्या आधारे रोज सांयकाळी होणार्‍या कार्यक्रमात कलाकारांशी खुल्लम खुल्ला चर्चा करण्याची रसिकांना संधी मिळाली. जे लोक इफीचे प्रतिनिधी नव्हते, अशांना या संधीचा लाभ घेता आला. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्याशीही रसिकांना संवाद साधता आला.

सिनेरसिक नेहमीच कोणताही चित्रपट पाहताना चित्रपट संपेपर्यंत जणू आपण या चित्रपटांतील नायकांची भूमिका करत असल्याचे मनात भासवत असतो. ज्या कथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती होत असते, त्या कथेच्या आधारावरच कलाकार अभिनय करीत असतो. तो कधी हसतो, कधी  रडतो, कधी संघर्ष करतो, कधी आपल्या संवाद फे कीतून न कळत लोकांचा चांगले  जगण्याचाही संदेश देत असतो. कलाकार हे नेहमीच आपले दुःख बाजूला सारून लोकांचे मनोरंजन करीत असतात. या मनोरंजनातून आणि उत्कृष्ट साकारलेल्या भूमिकेतून चित्रपट पाहणार्‍यांचा आत्मविश्‍वास वाढत जातो. चित्रपटांमुळे नव्या संकल्पना रसिकांच्या डोक्यात येत असतात. मात्र, अपवाद वगळता कोण काय घेईल याचा नेम कोण सांगावे.

नेहमीच हसरे आणि चकाचक असणार्‍या आपल्या आवडत्या अभिनेत्याला प्रत्यक्ष पाहिले की लोकांचा आंनद द्विगुणीत होत असतो.  याचाच प्रत्यय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आला. काही महिला आणि  लोकांनी तर येथे येणार्‍या कलाकाराला हात लावून ‘अरे मैने उसे हाथ लगाया, अरे ये तो हमारे जैसा ही है भाय,’ असे म्हणतं असतं. काहीजण या गोष्टींची टवाळी करीत असतील. मात्र, वर्षोंवर्षे आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी तपश्‍चर्या करणारे लोकही येथे आले होते. काहींनी आवडत्या कलाकारांना पाहून डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. काहीतरी बिनधास्त त्यांच्याशी चर्चा केली. आपण माझ्या मुलीला आवडता, तिच्याशी जरा बोला, असेही काही पालकांनी अभिनेत्याला सांगितले. या गोष्टीतून खर्‍या अर्थाने कलाकारांविषयी असणारी आपुलकी आणि प्रेम किती असते, ते अनेक गोष्टींतून स्पष्ट झाले.

समारोपप्रसंगी अभिनेता अक्षय कुमार यानेही आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या वडिलांबरोबर काश्मिरला गेल्यानंतर तेथे महान अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाचे  शुटिंग सुरू होते. शुटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची सही घेण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला बच्चन यांच्याकडे असलेल्या द्राक्षांची ओढ आणि बच्चन यांनी दिलेला द्राक्षाचा घड. आजही वयाच्या बाराव्या वर्षीच्या आठवणी अभिनेता अक्षय कुमार सांगत असेल, तर उद्या या पणजीत  गेल्या काही दिवसांपासून पाहिलेल्या अभिनेत्यांच्या आठवणीही रसिक  व काही मुले नक्कीच सांगतील.

गोव्यात होणार्‍या चित्रपट महोत्सवात काहींच्या नजरेत नुसत्याच चुका सापडल्या असतीलही. मात्र, काही नव्या गोष्टी, चांगल्या संकल्पना घेऊन आपण जाऊया, पुढच्या वर्षी होणार्‍या ‘इफफ’ची  वाट पाहत राम राम करूया!