Fri, May 29, 2020 21:04होमपेज › Goa › विरोधी पक्षनेत्याची निवड पक्षश्रेष्ठींकडून

विरोधी पक्षनेत्याची निवड पक्षश्रेष्ठींकडून

Published On: Jul 17 2019 2:05AM | Last Updated: Jul 17 2019 2:05AM
पणजी : प्रतिनिधी

राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेता काँग्रेसचे दिल्लीस्थित पक्षश्रेष्ठी ठेवणार असल्याची माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दिली. पर्वरी येथील विधानसभा संकुलाबाहेर ते पत्रकारांशी बोलताना दिली.

कामत म्हणाले की, काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी विरोधी पक्षनेता नेमणुकीबाबत पक्षाच्या पाचही आमदारांशी वैयक्‍तिकरित्या चर्चा केली आहे. ते आपला अहवाल दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांकडे सुपूर्द करणार असून येथील राजकीय स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. यानंतर, नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड दिल्लीहूनच जाहीर केली जाणार आहे. 

काँग्रेसचे तत्कालिन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली 9 आमदारांनी गेल्या बुधवारी भाजपात प्रवेश केला होता. यामुळे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहिले दोन दिवस विरोधी पक्षनेता नसताना कामकाज चालवण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे.