Wed, May 27, 2020 17:01होमपेज › Goa › काणकोणात तालुक्यातील किनार्‍यांवर शुकशुकाट

काणकोणात तालुक्यातील किनार्‍यांवर शुकशुकाट

Last Updated: Mar 21 2020 8:42PM
काणकोण : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पर्यटकांनी घराबाहेर पडणे टाळणे सुरू केले असल्यामुळे काणकोण तालुक्यातील पाळोळे, आंगोद तसेच इतर समुद्र   किनार्‍यावर सध्या शुकशुकाट पसरला असल्याचे दिसून येत आहे. पाळोळे व अन्य समुद्र किनार्‍यावर परदेशी व देशी पर्यटक अभावानेच दिसत आहेत. काही पर्यटक मायदेशी जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध नसल्याने अडकून पडले आहेत. तर काहींनी विमानतळावर कोरोनासंबधी चाचणीचा ससेमिरा चुकविण्यासाठी आहे तिथेच राहणे पसंत केले आहे. 

कोरोना व्हायरयमुळे  आंतरराज्य  वाहतूक बंद करण्यात येत असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंंचा तुटवडा भासेल या भितीने काणकोण बाजारात असलेल्या गोवा बागयदार संस्थेच्या   केंद्रात जीवनावश्यक वस्तूंंच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. गेले चार दिवस गोवा बागायतदार संस्थेच्या   काणकोण शाखेत ग्राहकांची जीवनावश्यक वस्तूंंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.  काणकोण बाजारात असलेल्या औषधालयातून मास्क व सॅनिटायझर गायब झाले आहेत.     

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून काणकोण पालिकेचा  शनिवारी भरणारा आठवडा बंद ठेवण्यात आला. पुढील निर्णय होईपर्यंत आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष नीतू देसाई यांनी सांगितले.