Tue, May 26, 2020 09:39होमपेज › Goa › कब्रस्तानासंदर्भात मडगाव, फोंडा,म्हापसा पालिकांना नोटिसा

कब्रस्तानासंदर्भात मडगाव, फोंडा,म्हापसा पालिकांना नोटिसा

Last Updated: Jan 23 2020 1:45AM
पणजी: पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील नगरपालिका कार्यक्षेत्रांमध्ये  मुस्लिम  कब्रस्तानांची   कमतरता असल्यासंबंधी   याचिकेच्या  पार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने  मंगळवारी    मडगाव, फोंडा व म्हापसा या तीन पालिकांना  नोटीस बजावली असून त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.   सय्यद मन्झुर अस्लम काद्री यांनी राज्यातील विविध पालिका क्षेत्रांमध्ये मुस्लिम कब्रस्तानची कमतरता असून सरकारने त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करुन  जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून  त्यावरील सुनावणीवेळी  ही नोटीस जारी करण्यात आली. 

काद्री यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले, की   मडगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात   मुस्लिम कब्रस्तान आहे. सदर कब्रस्तान हे 150 वर्ष जुने असून  ते डोंगराळ भागात आहे.  मडगाव पालिका क्षेत्रात  नवे कब्रस्तान बांधावे अशी मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.  या कब्रस्तानासाठी जमीनदेखील संपादित करण्यात आली होती मात्र आता ही जमीन अन्य कामासाठी देण्यात आली आहे.

म्हापसा पालिका क्षेत्रात कब्रस्तान आहे. मात्र  हे कब्रस्नात फार लहान आहे.  त्या भागातील जवळपास  38 पंचायतींकडून या कब्रस्तानचा वापर केला जात आहे. तर फोंडा पालिकेच्या हद्दात कब्रस्तानच नाही.  त्यामुळे या तिन्ही पालिकांना कब्रस्तानासंदर्भात आवश्यक ते निर्देश दिले जावेत अशी मागणी काद्री यांनी केली. त्यावर उच्च न्यायालयाने   मडगाव, फोंडा व म्हापसा या तीन पालिकांना  नोटीस बजावली असून त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.   या  जनहित याचिकेवरील पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होईल.