Thu, May 28, 2020 19:26होमपेज › Goa › नव्या१० आमदारांना मंत्रिपदे

नव्या१० आमदारांना मंत्रिपदे

Last Updated: Jan 31 2020 10:56PM

संग्रहित फाेटाेनवी दिल्ली, बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

हो-नाही, हो-नाही, असे करत अखेर नव्या 11 पैकी 10 आमदारांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी 10 नव्या आमदारांसह 13 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत पत्रकारांना दिली. मात्र, नव्या आमदारांपैकी एकाचा पत्ता कट झाला आहे. तो आमदार कोण, हे गुलदस्त्यात आहे. 
दरम्यान, मोठ्या आशेने दिल्‍लीला गेलेल्या येडियुराप्पा यांना भेटण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वेळच नव्हता. तर, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विस्ताराचा निर्णय शहा घेतील, असे सांगून हात वर केले. पण, अशातही संध्याकाळी वरिष्ठांनी मंत्रिमंडळात 13 जणांना स्थान देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. 

मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये राजकारण तापले आहे. त्यामुळे येडियुराप्पा वरिष्ठांकडे या विषयावर चर्चेसाठी गुरुवारी (दि. 30) दिल्‍लीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्री शहा गुरुवारी रात्री 9.30 वाजता त्यांना भेटणार होते. पण, ती भेट झाली नाही. त्यामुळे आज सकाळी 9.30 वाजता भेटण्याचे ठरले. दरम्यान, आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणासंदर्भात चर्चा करण्यासाठी शहा त्यांच्या भेटीस गेले होते. त्यामुळे सकाळी भेट होऊ शकली नाही. 

दुपारी 3 वाजता भाजप कार्यकारिणी सभा झाली. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता दिल्‍ली विधानसभा निवडणूक प्रचारात शहा सहभागी झाले. त्यामुळे येडियुराप्पा आणि शहा यांची भेट झालीच नाही. अखेर येडियुराप्पा यांनी अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय सांगितला. 

11 जण पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. शिवाय, पक्षाचे अनेक जण चार ते पाच वेळा विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना डावलून मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास वेगळा परिणाम होईल, असे सांगितले. त्यावर नड्डा यांनी, या प्रकरणी शहा हेच निर्णय घेणार असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगून हात वर केले. त्यांनी येडियुराप्पांच्या प्रस्तावाची प्रत ठेवून घेतली.

इतर तिघांच्या नावास संमती

संध्याकाळी येडियुराप्पा यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना वरिष्ठांनी पोटनिवडणुकीत निवडून आलेली 11 पैकी 10 आणि इतर तिघांना मंत्रिमंडळात घेण्यास संमती दिली आहे, असे सांगितले.

कत्ती यांना मंत्रिपद शक्य

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिलेल्या महितीनुसार इतर तिघांत उमेश कत्ती, अरविंद लिंबावळी आणि एस. ए. रामदास यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. त्यामुळे बेळगावातील एका आमदाराला मंत्रिपदाला हुकावे लागणार आहे.