Wed, May 27, 2020 04:03होमपेज › Goa › गोव्यातील सर्व शाळांसाठी नवीन नियम लागू

गोव्यातील सर्व शाळांसाठी नवीन नियम लागू

Last Updated: Nov 27 2019 5:10PM

संग्रहित छायाचित्रपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दोनवेळा ‘वॉटर ब्रेक’ द्यावा, अशी सूचना राज्य शैक्षणिक संचालनालयाने आजपासून  (ता.२७) पासून जारी केली. शालेय मुलांना मोठ्या प्रमाणात ‘निर्जलीकरण’ (डिहायड्रेशन) होत असल्याचे आढळून आल्याने ही सावधगिरी बाळगावी, असा आदेश संचालनालयाचे उप-संचालक शैलेश सिनाय झिंगाडे यांनी दिला आहे. 

राज्यातील सर्व सरकारी, सरकारी अनुदानप्राप्त, विना अनुदान प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच विशेष शाळांसाठी सदर आदेश बुधवारी जारी करण्यात आला आहे. या पत्रकात नमूद केले आहे, की शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना हव्या त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने त्यांना ‘निर्जलीकरण’ धोका संभवत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. 


शाळेतील दर दुसर्‍या आणि सहाव्या तासानंतर दोन मिनिटाचा ‘वॉटर ब्रेक’ द्यावा, व त्यासाठी एक लहानशी घंटा वाजवावी, अशी सूचना करण्यात आली आहे.