Thu, May 28, 2020 19:50होमपेज › Goa › गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली शपथ

गोव्याच्या नवनियुक्त राज्यपालांनी घेतली शपथ

Last Updated: Nov 03 2019 7:26PM

राज्यपाल सत्यपाल मलिकपणजी : प्रतिनिधी

गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यांनी राजभवनात आयोजित एका साध्या सोहळ्यात मलिक यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

दोनापावला येथील राजभवनाच्या बाहेर घातलेल्या शमियानात झालेल्या सोहळ्यात मुख्य सचिव परिमल राय यांनी राष्ट्रपती राम कोविंद यांनी २५ ऑक्टोबर रोजी काढलेला नियुक्तीचा आदेश हिंदी आणि इंग्रजी भाषेत वाचून दाखवला. या सोहळ्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक उपस्थित होते. गोव्याचे सभापती राजेश पाटणेकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासहीत राज्य मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दिपक प्रभू पाउसकर, आरोग्यमंत्री  विश्वजीत राणे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, नगरविकासमंत्री  मिलिंद नाईक, बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो आदी मान्यवर उपस्थित होते. 

आमदार सुदीन ढवळीकर, जोशुआ डिसौजा, निळकंट हळर्णकर, अलिना साल्ढाना, अँड जनरल देविदास पांगम, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योगपती, पत्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शपथविधिनंतर राज्यपालांना राज्य पोलिस दलाने मानवंदना दिली.