Fri, May 29, 2020 22:25होमपेज › Goa › नरेश सावळ लोकसभा लढणार नाहीत

नरेश सावळ लोकसभा लढणार नाहीत

Published On: Apr 02 2019 1:56AM | Last Updated: Apr 02 2019 1:03AM
डिचोली : प्रतिनिधी 

राष्ट्रीय राजकारणात  नरेश सावळ  एक दर्जेदार उमेदवार आहेत. परंतु वेळ कमी आहे, स्थानिक  राजकारण व समाजकारणात सावळ  यांनी वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यामुळे आता तरी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणे योग्य नाही,  त्यांनी स्थानिक  राजकारणातच आपले  काम चालू ठेवावे व  आगामी निवडणुकीत मोठ्या मतांनी विजय संपादन करून जनतेची सेवा करावी, असा ठाम निर्णय  सोमवारी नरेश सावळ समर्थकांनी घेतला. 

नरेश सावळ  म्हणाले, की कार्यकर्ते हीच आपली शक्ती असून त्यांच्या मतांचा आदर  करतो.  आपण लोकसभा निवडणुकीसाठी ढवळीकर बंधूंनी दिलेली संधी याचा आदर करतो, त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल   त्यांचा आभारी आहे. मात्र, आपण ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही. सोमवारी संदीपक प्लाझा येथे  प्रमुख कार्यकर्ता बैठकीत भगवान  हरमलकर, सुदिन नायक, विद्या परब, निसार शेख , निशांत चणेकर ,कुंदन फोगेरी ,भालचंद्र नार्वेकर  आदींनी आपले मत व्यक्त  केले. 

नरेश सावळ म्हणाले, की  ढवळीकर बंधूंनी  आपल्यावर विश्वास दाखवला व उमदेवार म्हणून आपले नाव निश्चित  केले. त्यानंतर  गोव्यातील कानोकोपर्‍यातून  शेकडो  संस्था व नागरिकांनी आपणाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डिचोलीतील कार्यकर्ते हीच आपली  असून त्यांनी जी मते व्यक्त केली त्यानुसार आपणही लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही, असा निर्णय  घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.