Tue, Sep 17, 2019 04:43होमपेज › Goa › बेकायदा जाहिरात फलकांवर मडगावात पालिकेचा हातोडा

बेकायदा जाहिरात फलकांवर मडगावात पालिकेचा हातोडा

Published On: Mar 30 2019 1:36AM | Last Updated: Mar 30 2019 1:36AM
मडगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मडगाव नगरपालिका शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांविरोधात  आक्रमक झाली आहे.  याच मोहिमेअंतर्गत मडगाव  पालिकेने गुरुवारी मडगाव शहरात टांगलेले शेकडो बेकायदेशीर जाहिरात फलक चक्क गॅस कटरच्या मदतीने तोडून हटवले.या कारवाईमुळे  गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली व्यापार्‍यांची  मक्तेदारी संपुष्टात आली आहे.  मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्या उपास्थितीत मडगाव पालिका उद्यान ते  बाजार परिसरापर्यंत थेट कारवाई राबवून बेकायदेशीर पणे लावलेले फलक आणि जाहिरातीचे फलक पालिकेने  हटवण्यात आले.

मडगाव शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याने मुख्याधिकारी नाईक यांनी बाजार निरीक्षक हसिना बेगम, अधिकारी दिलीप कारापूरकर  व अन्य अधिकार्‍यांसमवेत ही मोहीम राबवली.  सध्या लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू  असल्याने राजकिय  दाबावाचे प्रमाण कमी झालेले आहे. अधिकार्‍यांना  कारवाई करण्यास उत्तम संधी प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.   अतिक्रमण विरोधी मोहिमेअंतर्गत दरवेळी लाखो रुपयांचे साहित्य पालिकेकडून जप्त केले जात आहे.  इमारतीच्या बाहेर तसेच मुख्य रस्त्याच्या कडेला  बेकायदेशीरपणे  लावलेले जाहिरात गुरूवारी फलक मुख्याधिकार्‍यांनी हटविले. 

मडगाव नगरपालिका उद्यान परिसर, लोहिया मैदान परिसर, तसेच मडगाव मुख्य बाजारातील महत्त्वाच्या भागात मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध कपड्याची, भांड्याची, इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअर, किराणा दुकान, फोटो स्टुडिओ, सराफा व्यावसायिक आदी दुकानदारांचे जाहिरात फलक हटविण्यात आले असून   डॉक्टर, वकील, हॉटेल्स, बँका, फायनान्स कंपन्या व अन्य आस्थापनांचेही जाहिरात फलक  गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले. 

‘पुढारी’शी बोलताना मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक म्हणाले की, मडगाव शहरातील विविध ठिकाणचे जाहिरात फलक  हटविले असून जप्त केलेल्या फलकांचे तीन ट्रक भरले आहेत. ज्यांनी कुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या आस्थापनाची जाहिरात दर्शविण्यास फलक टांगलेले किंवा बसवले होते. त्यांचे हे बेकायदेशीर फलक काढून टाकण्यात आले आहेत. काहींनी हे फलक वरचेवरच टांगले असून अनेकांनी वेल्डिंग करून ते बसविले होते. यापुढेही  ही कारवाई सुरूच राहणार आहे.   
  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex