Wed, May 27, 2020 12:29होमपेज › Goa › मंत्र्यांवर कारवाई करावी

मंत्र्यांवर कारवाई करावी

Last Updated: Feb 24 2020 1:26AM
 मडगाव  ः पुढारी वृत्तसेवा

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कार्निव्हल मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहून मिरवणुकीचे उद्घाटन करत आहेत,हा प्रकार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरतो.त्यामुळे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर,बाबू कवळेकर  आणि अन्य मंत्र्यांवर कारवाई करावी,अशी तक्रार दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याकडे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी दाखल केली. 

दरम्यान, सदर तक्रारीची प्रत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकारीणीकडे पाठवित आहोत,असे उत्तर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी दुर्गादास कामत यांना ई-मेलद्वारे पाठवले आहे.

मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई हे रविवारी मडगावात  पार पडलेल्या कार्निव्हल  मिरवणुकीमध्ये सहभागी झाले नव्हते.  आचारसंहिता लागू झाली असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मंत्रिमंडळातील सदस्य कार्निव्हल मिरवणुकीच्या   उद्घाटन  सोहळ्यास उपस्थित  रहात असल्याने आमदार विजय सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली. गोवा फॉरवर्डने  मंत्र्यांविरूध्द आचारसंहिता भंगाची तक्रार   दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल केली असून संबंधित अधिकार्‍यांकडे ती पाठवली आहे,असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.