Mon, May 25, 2020 05:05होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी राज्यात तीव्र आंदोलन छेडणार : हृदयनाथ शिरोडकर

म्हादईप्रश्‍नी राज्यात तीव्र आंदोलन छेडणार : हृदयनाथ शिरोडकर

Last Updated: Dec 25 2019 7:48PM
पणजी : प्रतिनिधी 

कर्नाटकच्या कळसा भांडुरा प्रकल्पासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोव्याला दिलेले आश्‍वासन पाळले नाही. मंत्रालयाने घेतलेल्या ‘यु टर्न’ मुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकराने गोव्याचा विश्‍वासघात केला आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येत्या ३१ डिसेंबर रोजी म्हादईप्रश्‍नी राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. आंदोलनावेळी कुणाला त्रास झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू, असा इशारा बुधवारी प्रोगेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाच्या पत्रकार परिषदेत रुदयनाथ शिरोडकर यांनी दिला आहे.

प्रोगेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाच्या सदस्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
 
शिरोडकर म्हणाले, म्हादईसाठीचा लढा आता तीव्र करण्याची गरज असून गोमंतकीयांना आता रस्त्यावर उतरायला हवे. नवीन वर्षांनिमित्त राज्यात पर्यटक दाखल झाले आहेत. म्हादई आंदोलना दरम्यान पर्यटकांना त्रास झाल्यास त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. त्यामुळे पर्यटकांनी गोव्यात येण्यापुर्वी विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.