Mon, May 25, 2020 02:38होमपेज › Goa › मनोहर पर्रीकरांचे सुपुत्र उत्पल राजकारणात उतरणार?

उत्पल पर्रीकर राजकारणात उतरणार?

Published On: Mar 29 2019 11:39AM | Last Updated: Mar 29 2019 11:39AM
पणजी : प्रतिनिधी 

लोकांच्या भावना आपल्याला माहिती असून आपण राजकारणात उतरण्याची तयारी अजून केली नसली तरी सक्रिय राजकारणात उतरण्याबाबत आपण विचार करू, असे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

लोकसभेचे भाजपचे उमेदवार तथा केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक हे शुक्रवारी पणजी येथील श्री. महालक्ष्मी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी आले असता त्यांच्याबरोबर उत्पल पर्रीकरही सोबत होते. पणजी हा माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा मतदारसंघ होता. त्यांच्या निधनाने पणजी मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. पणजी पोटनिवडणुकीची तारीख अजून जाहीर झाली नसली तरी पणजी मतदारसंघामध्ये तसेच हितचिंतकामधून उत्पल पर्रीकर यांनी ही जागा पुन्हा मिळवावी असा विचार सुरू आहे. सोशल मीडियामधून आणि नेटीजन्सकडून उत्पल पर्रीकर यांच्या बाजूने प्रचार सुरू झाला आहे.

आपल्यांना लोकांच्या भावना समजल्या असून त्यावर आपण अजून ठामपणाने विचार केलेला नाही. मी दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांच्या प्रस्तावावर आपण लवकरच विचार करेन, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.