Tue, May 26, 2020 04:37होमपेज › Goa › मडगाव : मतदान यंत्रात बिघाड; भाजप आणि काँग्रेसच्या बाजूने जास्त मतदान 

मतदान यंत्रात बिघाड; मतदार माघारी फिरले

Published On: Apr 23 2019 11:07AM | Last Updated: Apr 23 2019 11:18AM
मडगाव : प्रतिनिधी

निवडणूक यंत्राची चाचणी करण्यासाठी झालेल्या मतदानात सर्व उमेदवारांना समान न मते न मिळता, भाजप आणि काँग्रेसच्या बाजूने जास्त मतदान होण्याचा प्रकार कुंकळ्ळी मतदातसंघातील तळेभाट मतदानकेंद्रावर घडला आहे. यामुळे गोंधळ उडाला. या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी तातडीने मतदान केंद्रावर धाव घेऊन लगेच मतदान यंत्र बदलेले. या प्रकारात मूळे तळेभाट मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया अडीज तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करता माघारी फिरले.

सविस्तर वृत्तानुसार, सकाळी सात वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्राची चाचणी केली जाते. तळेभाट येथील ३१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकार्‍यांनी सर्व सहाही उमेदवारांच्या बाजूने अनुक्रमे नऊ मते घालून मतदान यंत्राची चाचणी केली असता चाचणीसाठी घातलेली मते सर्वांना समान पद्धतीने न मिळता काही उमेदवारांच्या खात्यात जास्त तर काही उमेदवारांच्या खात्यात कमी मते गेल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी या प्रकाराची चौकशी केली असता भाजप उमेदवाराच्या खात्यात सर्वात जास्त सतरा मते गेल्याचे समोर आले. त्यानंतर काँग्रेसला नऊ, आम आदमी पक्षाला आठ आणि एका अपक्ष उमेदवाराच्या खात्यात एक मत गेल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले.

 मतदान यंत्राची तपासणी करे पर्यंत्‍न अर्धा तास वाया गेला होता. सकाळी सातला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या लोकांची रंग बरीच लांबलेली होती. या प्रकाराची माहिती आम आदमी पक्षाच्या निवडणूक एजंटने उमेदवार एल्विस गोम्स यांना दिल्या नंतर त्यांनी तातडीने मतदान केंद्रावर धाव घेतली. अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीत मतदान केंद्रावरील गोंधळ त्यांना दिसून आला.

या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.नऊ च्या दरम्यान दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अजित रॉय या ठिकाणी दाखल झाले.त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. आणि मतदान यंत्र बदलण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.हा सोपस्कर पूर्ण होई पर्यन्त मतदानाचा हक्क बाजावण्यासाठी आलेले मतदार बाहेर अडकून पडले होते. काही जण मतदान न करता माघारी परतले. पत्रकारांशी बोलताना अजित रॉय यांनी मतदान न करता गेलेल्या मतदारांशी संपर्क साधून त्यांना मतदान करण्यासाठी जास्त वेळ दिला जाईल अशी माहिती दिली आहे. या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी आपचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी केली आहे.

मतदान यंत्रात बिघाड झाला असला तरी जास्त मते भाजपच्या बाजूनेच का गेली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. चौकशी केल्यामुळे हा प्रकार समोर आला पण दक्षिण गोव्यात असा प्रकार घडत असावा असा आरोप एल्विस यांनी केला आहे.